Best Marathi Suvichar | मराठी सुविचार – 2023

Marathi Suvichar

आयुष्य जगत असताना सोबतीला फक्त विचार असुन चालत नाही. तर ते विचार सुंदर अर्थात सुविचार असावे लागतात. ज्याच्या जवळ सुंदर विचार आहेत तो कधीही एकटा नसतो. आज आपण असेच काही सुंदर सुविचार वाचणार आहोत.

सुविचार हि कोणत्याही भाषेची एक वेगळीच ओळख मानली जाते. कारण असे मानतात कि, जसे झाडाची व्यवस्थित वाढ होण्यासाठी पाण्याची गरज असते, तसेच मन समृध्द करण्यासाठी चांगल्या सुविचारांची गरज असते. चांगले सुविचार माणसाला अधिक समृध्द बनवतात.[Marathi Suvichar]

Marathi Suvichar

Marathi Suvichar

विश्वास हा एका खोडरबरसारखा असतो,
तुम्ही केलेल्या प्रत्येक चुकीबरोबर तो कमी होत जातो.

 

आवड आणि आत्मविश्वास असेल तर
जगात कुठलीही गोष्ट अशक्य नाही.

 

यश प्राप्त करण्यासाठी,
यशस्वी होण्यासाठीची तुमची इच्छा हि
अपयशी होण्याच्या भीतीपेक्षा
जास्त प्रबळ असली पाहिजे.

 

जर तुम्हाला तुमची श्रीमंती मोजायची असेल तर
नोटा मोजू नका कधी चुकून डोळ्यांत दोन अश्रू आले
तर ते पुसायला किती जन येतात ते मोजा.

 

मन ओळखणाऱ्यांपेक्षा
मन जपणारी माणस हवीत कारण,
ओळख ही क्षणभरासाठी असते
तर जपवणूक आयुष्यभरासाठी.

 

मोठी स्वप्ने पाहणारीच
मोठी स्वप्ने प्रत्यक्षात उतरवतात.

 

मोती बनून शिंपल्यात राहण्यापेक्षा
दवबिंदू होऊन चातकाची तहान भागविणे जास्त श्रेष्ठ.

 

आयुष्यात काही शिकायचे असेल
तर कठीण परिस्थितीतही शांत राहणं शिका.

 

नात्याची सुंदरता एकमेकांचे दोष स्वीकारण्यात आहे
कारण एकही दोष नसलेल्या माणसाचा शोध घेत बसलात,
तर आयुष्यभर एकटे राहाल.

 

कुणा वाचून कुणाचे काहीच अडत नाही
हे जरी खरे असले तरी कोण
कधी उपयोगी पडेल हे सांगता येत नाही.

 

ज्या व्यक्तीकडून काहीच अपॆक्षा नसतात,
तेच कधी कधी चमत्कार घडवून दाखवतात.

 

प्रत्येक बाबतीत दुसऱ्याच अनुकरण करू नका,
स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण करा.[Marathi Suvichar]

Read Also : Best Motivational Quotes In Hindi – 2023

मराठी सुविचार[Marathi Suvichar]

 Marathi Suvichar
Marathi -Suvichar

माणसानं राजहंसासारखं असावं.
आपल्याला जे पटेल तेच घ्यावं,
नाही ते सोडून द्यावं.

 

जिंकणे म्हणजे नेहमी फक्त पहिला येणे असे नसते,
एखादी गोष्ट पूर्वीपेक्षा
जास्त चांगली करणे म्हणजेच जिंकणे होय.

 

दृष्टीकोन हा मनाचा आरसा आहे.
तो नेहमी विचारच परावर्तीत करतो

 

जी व्यक्ती तुमच्या प्रगती वर जळते
त्याचा तिरस्कार कधीच करू नका.
कारण ती व्यक्ती स्वतापेक्षा तुम्हाला
उत्कृष्ट व्यक्ती समजून जळत असते.

 

समुद्रात कितीही मोठे वादळ आले
तरी
समुद्र आपली शांतता कधीही सोडत नाही.

 

कामाचा खूप व्याप असतानाही
आवर्जून काढली जाणारी आठवण म्हणजेच
खरी मैत्री.[Marathi Suvichar]

 

माणसाचं छोट दु:ख
जगाच्या मोठ्या दु:खात मिसळून गेलं
की त्याला सुखाची चव येते.

Marathi Suvichar Short[Marathi Suvichar]

Marathi Suvichar
Marathi Suvichar

विचारवंत होण्यापेक्षा आचारवंत व्हा.

शिक्षण हा मानवाचा तिसरा डोळा आहे.

चांगला माणूस घडवणे
हेच शिक्षणाचे खरे ध्येय आहे.

 

आपण जे पेरतो तेच उगवतं.

सरावानेच अचूकता निर्माण करता येते.

 

ज्याने आयुष्यात काहीच चूक केली नाही,
याचा अर्थ त्याने आपल्या जीवनात काहीच केले नाही.

 

रागाला जिंकण्याचा एकमेव उपाय म्हणजे
मौन

स्वतःच अस्तित्व दाखवून दिल्याशिवाय
आपल्या उपस्थितिची दखल घेतली जात नाही.

 

यशाकडे नेणारा सर्वात जवळचा मार्ग
अजून तयार व्हायचा आहे.

भेकड म्हणून जगण्यापेक्षा
शुराचे मरण कधीही चांगले.

 

काट्यावरून चालणारी व्यक्ती ध्येयापर्यंत लवकर पोहचते,
कारण पायात रूतणारे काटे पायांचा वेग वाढवतात.

 

धैर्यहीन मनुष्य
तेलहीन दिव्यासारखा असतो.

 

डोक शांत असेल तर निर्णय चुकत नाही,
भाषा गोड असेल तर माणसं तुटत नाहीत.

भविष्याचा अंदाज घेण्याचा
उत्तम मार्ग म्हणजे
तो तयार करणे.[Marathi Suvichar]

 

जर वाईट सवयी वेळेत बदलल्या नाहीत,
तर त्या सवयी आपला वेळ बदलतात.

आपण जोवर काही करत नाही
तोवर सर्व अशक्य दिसते.

 

स्वतःला कमजोर समजणे
हि मोठी चूक आहे.

मैत्री हि वर्तुळासारखी असते,
ज्याला कधीच शेवट नसतो.

सौंदर्य हे वस्तूत नसते,
पाहणाऱ्याच्या दृष्टीत असते.

 

Marathi Suvichar Status

Best Marathi Suvichar

थेंब कितीही लहान असला तरी
त्याच्यात अथांग सागरात
तरंग निर्माण करण्याची क्षमता असते.
त्यामुळे स्वतः ला कधीही लहान समजू नका.

 

प्रामाणिकपणा हि खूपच बहुमुल्य वस्तू आहे,
कुठल्याही फालतू माणसाकडून
त्याची अपेक्षा धरू नका.

 

मनुष्याची आर्थिक स्थिती
कितीही चांगली असली
तरीही
जीवनाचा खरा आनंद घेण्यासाठी
त्याची मनस्थिती चांगली असावी लागते.

 

जगात प्रत्येकाकडे 24 तास असतात,
ज्यांना यशस्वी व्हायचे असेल,
ते त्याचा योग्य प्रकारे वापर करतात.

 

स्वतःची वाट स्वताच बनवा,
कारण
इथे लोक वाट दाखवायला नाही तर
वाट लावायला बसलेत.

 

कारण सांगणारी लोक यशस्वी होत नाही,
आणि
यशस्वी होणारे लोक कारण सांगत नाही.

 

मोत्याच्या हारापेक्षा
घामाच्या धारांनी
मनुष्य अधिक शोभून दिसतो.

 

संकटं तुमच्यातली
शक्ती, जिद्द
पाहण्यासाठीच येत असतात.

 

कामात आनंद निर्माण केला की,
त्याचं ओझं वाटत नाही.

Marathi Suvichar

जगातील सर्वात सुंदर रोपटे विश्वासाचे असते
आणि
ते कोठे जमिनीवर नाही तर
आपल्या मनात रुजवावे लागते.

 

गुणांचं कौतुक उशीरा होतं;
पण होतं जरूर…

 

या जगात
कुठलीच गोष्ट कायम स्वरुपी रहात नाही,
तुमचं दु:ख सुद्धा.

 

स्वभाव पेढ्यासारखा पाहिजे…
जो राजवाड्यात जेवढी चव देतो,
तेवढीच चव झोपडीत पण देतो.

 

बचत म्हणजे काय
आणि ती कशी करावी
हे मधमाश्यांकडून शिकावं.

 

Marathi Suvichar on life

Marathi Suvichar on life
Marathi -Suvichar -on- life

नेहमी तत्पर रहा,
बेसावध आयुष्य जगू नका.

 

विश्वास हा खोडरबर सारखा असतो तुम्ही,
केलेल्या प्रत्येक चुकीबरोबर तो कमी होत जातो.

 

भूक आहे तेवढे खाणे ही प्रकृती,
भूक आहे त्यापेक्षा जास्त खाणे ही विकृती,
आणि वेळप्रसंगी स्वत: उपाशी राहून,
दुसऱ्याची भूक भागवणे ही संस्कृती.

 

गरूडाइतके उडता येत नाही,
म्हणून चिमणी कधी उडण्याचे सोडत नाही.

 

कोणतेही कार्य हे अडथळ्याशिवाय पार पडत नाही.
शेवटपर्यंत जे प्रयत्न करत राहतात त्यानांच यश प्राप्त होते.

 

पाप इतका सुंदर पोशाख घालून येते की,
ते पाप आहे असे माहीत असूनही
आपण त्याला कवटाळतो.

 

संकटं टाळणं माणसाच्या हाती नसतं,
पण संकटाचा सामना करणं,
त्याच्या हातात असतं.

 

विजेते वेगळ्या गोष्टी करत नाही,
ते प्रत्येक गोष्ट वेगळेपणाने करतात.

 

खूप माणसांची स्वप्ने या एका विचारामुळे
अपूर्ण राहतात तो म्हणजे “लोक काय म्हणतील?

 

अन्याय करणे हे पाप आणि
होणारा अन्याय सहन करणे,
किंवा उघड्या डोळ्यांनी पाहणे हे महापाप !

Marathi Suvichar

टीका करणाऱ्या शत्रुंपेक्षा दिखाऊ
स्तुती करणाऱ्या मित्रांपासून सावध रहा.

 

अडचणीत असतांना अडचणीपासून दूर पळणे
म्हणजे अजून मोठ्या अडचणीत जाण्यासारखेच आहे.

 

नाही हा शब्द तुम्हाला ऐकू येत नाही,
तोपर्यंत सगळे काही शक्य आहे.

 

प्रसिध्दी ही अशी बाब आहे,
जी कितीही मिळाली तरी,
माणसाची तहान भागत नाही.

 

मोठी स्वप्ने पाहणारेच,
मोठी स्वप्ने सत्यात उतरवतात.

 

खूप मोठा अडथळा आला की समजावं
आपण विजयाच्या जवळ आलो.

 

स्वप्न पाहतच असालं तर मोठीच पाहा. लहान कशाला?
कारण मोठी स्वप्नेच माणसाच रक्त ढवळू शकतात.

 

आपली खरी स्वप्न तीच आहेत जी आपल्याला
रात्री उशिरापर्यंत जगण्यास आणि
सकाळी लवकर उठण्यास भाग पाडतात.

 

जीवनात चांगला माणूस होण्यासाठी एवढंच करा.
चुकाल तेव्हा माफी मागा,
अन कुणी चुकलं तर माफ करा.

 

न हरता, न थकता न थाबंता
प्रयत्न करणाऱ्यांसमोर
कधी कधी नशीब सुध्दा हरत.

 

जीवनात त्रास त्यांनाच होतो
जे सतत जबाबदारी स्वीकारतात आणि
जबाबदारी स्वीकारणारे कधीच हरत नाही
एकतर ते जिंकतात किंवा काहीतरी शिकतात.

 

Marathi Motivational Suvichar

 

प्रसिध्द व्यक्ती होण्यासाठी
आयुष्यातला क्षण न क्षण कोणत्यातरी
एका क्षेत्रात सतत उगळावा लगतो.

 

आपल्या नियतीचे मालक बना
पण परिस्थितीचे गुलाम बनू नका.

 

मनाचे दरवाजे नेहमी खुले ठेवा;
ज्ञानाचा प्रकाश कुठुन
कधी येईल सांगता येत नाही.

 

विचार असे मांडा कि तुमच्या
विचारांवर कुणीतरी विचार केलाच पाहिजे.

 

जगा इतकं कि आयुष्य कमी पडेल,
हसा इतके कि आनंद कमी पडेल,
काही मिळाले तर नशिबाचा खेळ आहे,
पण प्रयत्न इतके करा कि
परमेश्वराला देणे भागच पडेल.

 

एखाद्याला गुन्हेगार ठरविताना
त्याच्या जागी स्वत:ला ठेवून बघा.

 

भुतकाळ आपल्याला आठवणींचा आनंद देतो;
भविष्यकाळ आपल्याला स्वप्नांचा आनंद देतो
पण आयुष्याचा आनंद फक्त वर्तमानकाळच देतो.

 

कोणाच्याही सावलीखाली उभा राहिल्यावर
स्वतःची सावली कधीच निर्माण होत नाही.
स्वतःची सावली निर्माण करण्यासाठी
स्वतः उन्हात उभे रहावे लागते.

Marathi Suvichar

कोणी कौतुक करो वा टीका लाभ तुमचाच,
कौतुक प्रेरणा देते, तर टीका सुधारण्याची संधी.

 

आपल्या दोषांवरचे उपाय
नेहमी आपल्याकडेच असतात;
फक्त ते शोधण्याची तसदी घ्यावी लागते.

 

चांगला गुरु यशाचे दरवाजे उघडून देऊ शकतो,
पण त्यातून यशाच्या दिशेने
जाण्यासाठी स्वतःलाच चालावे लागते.

 

कडू घोट प्रेमळ माणसाच्या
हातून दिल्यास तो कमी कडू लागतो.

 

भरणाऱ्या जखमा भरू द्याव्यात;
त्याची खपली काढू नये.

 

प्रत्येकाशी प्रेमाने वागलं पाहिजे,
जे तुमच्याशी वाईट वागतात त्यांच्याशीही
प्रेमानच वागल पाहिजे ते चांगले आहेत म्हणून नाही,
तर तुम्ही चांगले आहात म्हणून.

 

बोलावे की बोलू नये,
असा संभ्रम निर्माण झाला असता
मौनाने बोलण्याची जागा घ्यावी.

 

शत्रूने केलेले कौतुक
हीच आपली सर्वोत्तम कीर्ती होय.

 

तुमचा आजचा संघर्ष
तुमचे उद्याचे सामर्थ निर्माण करतो
त्यामुळे विचार बदला म्हणजे तुमचे आयुष्य बदलेल.

 

जर तुम्ही नेहमीच सार्वसाधारण जीवन जगण्याचा
प्रयत्न करीत असालं तर,
तुम्हाला कधीच हे उमजणार नाही कि,
तुम्ही किती असामान्य आहात.

 

यश हे सोपे कारण ते कशाच्या तरी तुलनेत असते,
पण समाधान हे महाकाठीन,
कारण त्याला मनाचीच परवानगी लागते.

 

आपलं जे असतं ते आपलं असतं
आणि आपलं जे नसतं ते आपलं नसतं.

 

माझं प्रयत्न इतरांपेक्षा श्रेष्ठ असला पाहिजे अस नाही,
पण जो मी काल होतो त्यापेक्षा आज अधिक चांगला हवा.

 

जो धोका पत्करण्यास कचरतो,
तो लढाई काय जिंकणार !

 

हृदये परस्परांना द्यावीत,
ती परस्परांच्या अधीन करू नयेत.

 

कधी कधी देव तुमची परिस्थिती बदलत नाही
कारण त्याला तुमची मनस्थिती बदलायची असते.

 

कर्तव्य पार न पाडता हक्कांच्या मागे
धावलात तर हक्क दुर पळतात.

 

सुरुवात कशी झाली यावर
बऱ्याच घटनांचा शेवट अवलंबून असतो.

 

Marathi Suvichar for Students

 

यश मिळवायचं असेल तर
स्वत:च स्वत:वर काही बंधन घाला.

 

चांगले काम करायचे मनात
आले की ते लगेच करून टाका.

 

प्रत्येकाच्या मनात एक
आदर्श व्यक्ती असलीच पाहिजे.

 

केवड्याला फळ येत नाही पण
त्याच्या सुगंधाने तो
अवघ्या जगाला मोहवून टाकतो.

 

भितीयुक्त श्रीमंत जीवन जगण्यापेक्षा
शांततामय, मानाचे गरीब जीवन चांगले.

 

निश्चयी भिकारी हा अनिश्चयी
सम्राटापेक्षा कितीतरी श्रेष्ठ असतो.

 

प्रतिकूलतेतही अनुकूलता निर्माण करतो
तोच खरा माणूस ![Marathi Suvichar]

 

मित्र परिसासारखे असावेत
म्हणजे आयुष्याचं सोनं होतं.

 

माणसाची खरी ओळख
त्याच्या अंतःकरणाच्या नम्रतेने होते.

 

आपला चेहरा हा आपल्या मनाचा आरसा असतो.

 

फ़ळाची अपेक्षा करुन
सत्कर्म कधीच करु नये.

 

उशीरा दिलेला न्याय हा
न दिलेल्या न्यायासारखा असतो.

 

संकटात उडी घेऊन जे कार्य करतात
त्यांनाच विजयश्री हार घालते.

 

हिंसा हे दुर्बलांचे शस्त्र आहे,
अहिंसा हे सबलांचे.[Marathi Suvichar]

 

शहाणा माणूस चुका विसरतो,
पण त्याची कारणे नाही.

 

प्रेम सर्वांवर करा पण
श्रध्दा फ़क्त परमेश्वरावरच ठेवा.

 

मी माझ्यासाठी आहे त्यापेक्षा
मी कुणासाठीतरी आहे
ही भावनाच किती श्रेष्ठ !

 

ज्ञान हे पैशापेक्षा श्रेष्ठ आहे
कारण पैशाचे रक्षण तुम्हाला करावे लागते;
ज्ञान तुमचेच रक्षण करते.

 

विज्ञानाचं तंत्र शिका
पण जगण्याचा मंत्र हरवू नका.

 

फ़क्त स्वत:साठी जगलास तर मेलास
आणि स्वत:साठी जगून
दुसऱ्यांसाठी जगलास तर जगलास !

 

जो मूळ सोडून फाद्यांचा शोध घेतो तो भरकटतो.

 

ज्याच्या डोळ्यात आत्मविश्वासाचे अंजन असते;
तो कूठल्याही काळोखातून सहज मार्ग कढतो.

 

काही गोष्टी आपल्याला प्रिय नसतानाही
कराव्या लागतात कर्तव्य म्हणून.

 

निघून गेलेला क्षण
कधीच परत आणता येत नाही.

 

उद्याचं काम आज करा
आणि आजचं काम आत्ताच करा.

 

ज्ञानेंद्रियांवर संपूर्ण ताबा हाच खरा विजय होय.

 

जीवनात पुढे जायचे असेल तर
आपल्या अनावश्यक गरजा
वाढणार नाहीत याची काळजी घ्या.

 

केवळ योगायोग असे काहीही नाही.
जीवनातील प्रत्येक घटनेला अर्थ असतो.

 

नवं काहीतरी शिकण्यासाठी
मिळालेला वेळ म्हणजे सुट्टी.

 

वैराने वैर वाढेल,
परंतु प्रेमाने वैर कमी होईल म्हणून
आपल्या शत्रुवरही प्रेम करायला शिका.

 

परमेश्वराच्या आशीर्वादाशिवाय
कुठलेही कार्य सिध्दीस जात नाही.

[Marathi Suvichar for Students]

Sharing Is Caring:

Leave a Comment